चिपळूण-खेड रेल्वे वाहतूक आज तीन तास बंद

    दिनांक  01-Oct-2019 11:08:52रत्नागिरी : चिपळूण-खेड रेल्वे मार्गावरील वाहतूक मंगळवारी रात्री तीन तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. अंजनी रेल्वे स्थानकात नवी लूप लाईन कार्यान्वित करण्याचे काम सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजताच्या दरम्यान केले जाणार आहे. याचा फटका कोकण रेल्वे आणि इतर प्रवाशांना बसणार आहे. दरम्यान या मार्गावरील गाड्यांच्या वेळा बदलण्यात येणार आहेत.

 
 
 
 

गाडी क्रमांक १२०५ मडगाव-दादर जनशताब्दी एक्सप्रेस ही गाडी १ ऑक्टोबर रोजी निघणारी गाडी दुपारी १.४५ वाजता म्हणजेच दीड तास उशीराने सुटणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस, दादर-रत्नागिरी पॅसेंजर, लोकमान्य टीळक टर्मिनस कोचुवेली एक्सप्रेस, सावंतवाडी-दादर तुतारी एक्सप्रेस, मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकणकन्या एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.