'घरचे जेवण द्या', चिदंबरम यांची न्यायालयाला विनंती

01 Oct 2019 22:16:33



३ ऑक्टोबर रोजी सुनावणी 
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): आयएनएक्स मिडीया घोटाळ्यात कारागृहात असलेले माजी केंद्रीय मंत्री व कॉंग्रेस नेते चिदम्बरम यांनी दिल्लीच्या राउज एवेन्यु न्यायालयात घरचे जेवण खाण्याची परवनागी मिळावी अशी विनंती करणारी याचिका दाखल केली आहे. तीन ऑक्टोबर रोजी चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीसंबंधी सुनावणी होणार आहे.


२० सप्टेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायलयाने चिदंबरम यांच्या जामीनयाचिका खारीज केल्या होत्या. पुराव्यांशी छेडछाड केली जाऊ शकते, याच्या आधारे चिदंबरम यांची रवानगी कोठडीत झाली होती.

न्यायालयाने चिदंबरम यांना नातेवाईकांशी भेटण्याची परवानगी दिली होती.



पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मिडीया प्रकरणात २१ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. संबंधित घोटाळा ३०५ करोड चा असल्याचा आरोप आहे. विदेशातून गुंतवणूक घेताना अनियमितता आढळल्यामुळे सीबीआय ने मी २०१७ मध्ये गुन्हा दाखल केला होता. त्याच्या तपासात चिदंबरम यांचे नाव आले होते. सीबीआय यंत्रणेला त्यांच्या विरोधात गुन्ह्यात सहभागी असल्याचे पुरावे हाती लागल्याचे सांगितले जाते.

 
Powered By Sangraha 9.0