'सत्यमेव जयते २' च्या पोस्टर्समध्ये देशभक्तीचे दर्शन

01 Oct 2019 14:21:35


 

जॉन अब्राहम स्टारर 'सत्यमेव जयते २' चित्रपटाची दोन पोस्टर्स आज सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली. एका पोस्टरमध्ये चित्रपटातील मुख्य अभिनेता जॉन अब्राहम याची देशभक्ती झळकत आहे, तर दुसऱ्या पोस्टरमध्येदेखील आपल्या तिरंग्याच्या रंगांची ओढणी लपेटून दिव्या खोसला-कुमार आपल्या देशभक्तीचे रूप प्रेक्षकांसमोर घेऊन आले आहेत. 'तन मन धन से बेहतर जन गण मन' असे या दोन्ही पोस्टर्सचे स्लोगन आहे.

मिलाप झवेरी दिग्दर्शित 'सत्यमेव जयते' या चित्रपटाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आणि आता त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच पुढील वर्षीच्या गांधी जयंतीला 'सत्यमेव जयते २' देशभर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'सत्यमेव जयते' मधून यापूर्वी आपल्या अभिनयाने जॉनने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती. आता आगामी वर्षात आधीसारखेच तो प्रेक्षकांना खुश करतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दरम्यान पुढील वर्षी २ ऑक्टोबरलाच प्रदर्शित होणाऱ्या तुफान, सरदार उधमसिंह आणि रॅम्बो या चित्रपटांशी 'सत्यमेव जयते २' ची टक्कर रंगणार आहे.

Powered By Sangraha 9.0