सूडभावनेवर आधारलेले 'लाल कप्तान' चे नवीन पोस्टर प्रदर्शित

01 Oct 2019 11:47:36


दिग्दर्शक आणि पटकथा लेखक नवदीप सिंह यांचा 'लाल कप्तान' चित्रपटाचे नवीन पोस्टर आज प्रदर्शित झाले. या नवीन पोस्टरमध्ये सैफ अली खान च्या चित्रपटातील भूमिकेचे चित्रण आहे तर वाळवंट आणि त्याच्या बंदुकीच्या निशाण्यावर असलेले त्याचे शत्रू यांचे दृश्य देखील दिसते आहे. 'लाल कप्तान' या चित्रपटाची कथा नागा साधूंच्या जीवनावर आधारित आहे. या पोस्टरमधून अनेक महत्वाच्या गोष्टी उघड होत आहेत त्यामुळे हे पोस्टर खूपच प्रभावशाली आहे असे म्हणावे लागेल.

दरम्यान या चित्रपटात सैफ अली खान मुख्य भूमिका साकारणार असून तो एका नागा साधूच्या भूमिकेत झळकणारे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या त्या पोस्टरमधील लूकला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. आणि सध्या सैफ अली खान आव्हानात्मक भूमिका स्वीकारताना दिसत आहे. आधी सेक्रेड गेम्स मधील सरताज आणि आता नागा साधू अशा वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका तो स्वीकारत आहे. प्रेक्षक देखील त्याच्या या भूमिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

'लाल कप्तान' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेमध्ये आत्तापर्यंत दोन वेळा बदल करण्यात आला. सुरुवातीला चित्रपट ६ सप्टेंबरला प्रदर्शित होईल असे जाहीर करण्यात आले, मग ११ ऑक्टोबर आणि अखेर नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या तारखेनुसार आता हा चित्रपट १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

Powered By Sangraha 9.0