अवघ्या ८९९ रुपयांत करा विमानप्रवास!

09 Jan 2019 17:25:43


 

इंडिगो कंपनीची न्यू इयर सेल ऑफर

 

मुंबई : स्पर्धेच्या वाढत्या युगात कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन ऑफर लॉन्च करत असतात. यामध्ये लहानापासून ते अनेक मोठं मोठ्या कंपन्यांचा यामध्ये समावेश असतो. आपल्या ग्राहकांना वेळोवेळी ऑफर देणाऱ्या इंडिगो कंपनीने अशीच एक भन्नाट ऑफर सादर केली आहे. यामध्ये अवघ्या ८९९ रुपयांमध्ये हवाई प्रवास करता येणार आहे. न्यू इयर सेल अंतर्गत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने ही सादर केली आहे.
 

इंडिगो कंपनीने सादर केलेल्या ऑफरनुसार प्रवाशांना देशांतर्गत विमान प्रवासासाठी केवळ ८९९ रुपयांपासून तिकीट दर ठेवण्यात आले आहेत. तर, आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी फक्त ३ हजार ३९९ रुपयांपासून तिकीट दर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सोबतच मोबिक्विक अॅपवरून तिकीट बुक केल्यास ग्राहकांना अतिरिक्त १५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. न्यू इयर सेल अंतर्गत तिकीट बुकिंगसाठी आजपासून सुरूवात झाली असून १३ जानेवारीपर्यंत तिकीट बुक करता येणार आहे. तिकीट बुक केल्यानंतर २४ जानेवारी ते १५ एप्रिल दरम्यान तुम्हाला हा विमानप्रवास करता येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0