नागपूरमध्ये रुग्णालयाला आग ; कामगार अडकले

    दिनांक  09-Jan-2019


 


नागपूर : नागपूरमधील किंग्सवे भागात बांधकाम चालू असलेल्या रुग्णालयाला आग लागली. या आगीमध्ये कामगार अडकले असून ७-८ कामगारांना बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. तरीही, काही कामगार अजूनही अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

 

घटनास्थळी ४ हुन अधिक अग्निशामकाच्या गाड्या पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप आगीचे कारण पुढे आलेले नाही. आगीमुळे भागात धुरांचे ढग तयार झाले आहेत. अद्याप कुठलीही जीवितहानीची माहिती मिळाली नसून अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/