साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा

    दिनांक  09-Jan-2019


 


नागपूर : अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी राजीनामा दिला आहे. विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर राजीनामा पाठवून सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. जेष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केल्याच्या वादातून हे पाऊल उचलायचे सांगितले जात आहे.

 

"जे जे सांगायचे होते, ते सांगून झाले आहे. गेले दोन दिवस माध्यमांच्याच सेवेत असल्याने महामंडळाचे अध्यक्ष काहीही काम करू शकलेले नाहीत. थकून गेले आहेत. कृपया कुणीही त्यांच्याशी संपर्क साधू नये." असे जोशी यांनी माध्यमांना कळवले आहे. यापुढे काहीही माहिती हवी असल्यास महामंडळाच्या उपाध्यक्षांकडे विचारणा करा, असेही त्यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/