पुणे मनपा वर्ग-४ च्या सेवकांना धुलाई भत्ता लागू होणार?

08 Jan 2019 16:59:51



 

शासन सकारात्मक असल्याची डॉ. रणजित पाटील यांची माहिती

 

मुंबई : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याअंतर्गत कीटक प्रतिबंधक विभाग आणि व नागरी हिवताप विभागाकडील वर्ग-४च्या सेवकांना घाणभत्ता व धुलाई भत्ता लागू करण्यासाठी तसेच लाड पागे समितीने शिफारस केलेल्या काही शिफारसी लागू करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. मंत्रालयीन दालनात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
 

लाड पागे समितीच्या काही शिफारशी या वर्गाला लागू करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर तयार करुन मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्याबाबतचे निर्देश डॉ. पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे हे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर पुणे महानगरपालिका, नगरविकास विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0