हज यात्रेकरिता जाणाऱ्यांसाठी लॉटरीची सोडत

07 Jan 2019 16:57:56



अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झाली सोडत

 

मुंबई : हज यात्रेकरिता जाणाऱ्यांसाठी लॉटरीची (कुरी) सोडत अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झाली. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसलगत असलेल्या हज हाऊस येथे हा कार्यक्रम पार पडला. देशात उत्तरप्रदेशनंतर महाराष्ट्रातून सर्वाधिक यात्रेकरु हज यात्रेसाठी जातात. या यात्रेकरुंच्या सुरक्षेला राज्य शासनाचे प्राधान्य असल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले.
 

हज २०१९साठी केंद्राकडून महाराष्ट्राला ११ हजार ९०७ इतका प्राथमिक कोटा प्राप्त झाला होता. यासाठी महाराष्ट्रातून एकूण ३५ हजार ६६६ अर्जदारांकडून अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी ७० वर्षांहून अधिक वय असलेले (राखीव अ प्रवर्ग) आणि महिला राखीव प्रवर्ग (मेहरम शिवाय जाणाऱ्या स्त्रिया) असे २ हजार २८५ जागा वगळता एकूण ९ हजार ६२२ हज यात्रेकरुंकरिता लॉटरी (कुरी) काढण्यात आली. यावेळी अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, महाराष्ट्र राज्य हज समितीचे गफर मगदूम, अधिकारी इम्तियाज काझी आदी यावेळी उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0