पंतने रचले 'हे' विक्रम

04 Jan 2019 14:55:49



सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या कसोटीत यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने एका खास विक्रमाची नोंद केली आहे. पंतने त्याच्या कारकिर्दीतले दुसरे शतक ठोकले आहे. आतापर्यंत अशी खेळी भारताच्या कोणत्याही यष्टीरक्षक फलंदाजाला करता आली नाही. पंत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड देशात शतक ठोकणारा पहिला भारतीय तर जगातला दुसरा यष्टीरक्षक बनला आहे. त्याच्या आधी जेफ्री डू जॉन यांनी हा विक्रम केला होता. त्यांनी डू जॉन यांनी मॅनचेस्टर आणि पर्थ येथे १९८४ साली शतके ठोकली होते.

 

पंतने १३७ चेडूंत ८ चौकाराच्या साहाय्याने शतक पूर्ण केले. पंतने यापूर्वी ओवलमध्ये ११४ धावा केल्या. भारताने ७ बाद ६२२ धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे पंतला एबीडिविलियर्सच्या विक्रम त्याला मोडता आला नाही. एबीने ऑस्ट्रेलियाच्या मैदानात यष्टीरक्षक म्हणून १६९ सर्वाधिक धावा केल्या. त्याने २०१२ मध्ये ही खेळी केली होती.

 

ऋषभ पंतने एकाच कसोटी मालिकेत २०० पेक्षा जास्त धावा आणि २० पेक्षा अधिक झेल घेणारा आशियातील पहिला यष्टीरक्षक बनला आहे. आशियाच्या बाहेर सर्वाधिक कसोटी शतक ठोकण्याच्या यादीत पंत मोईन खान आणि मुश्फिकुर रहीम यांच्यासोबत संयुक्त रित्या पहिल्या स्थानी आहे. या तिघांनी आशियाच्या बाहेर प्रत्येकी २ शतके ठोकली आहेत. तसेच, ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शतक ठोकणारा पंत हा दुसरा सर्वाधिक तरुण क्रिकेटपटू ठरला. तो २१ वर्षांचा आहे. यापूर्वी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १८व्या वर्षी दोन शतके ठोकली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0