आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याला २.५ लाख

04 Jan 2019 17:22:55



मुंबई : आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याला आत सरकारकडून बहुमूल्य पाठिंबा मिळणार आहे. त्यांना ५० हजार ते अडीच लाखांपर्यंतची मदत करणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. आंतरजातीय विवाहविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांमुळे सरकारने हे पाऊल घेतले आहे. यापूर्वी ही रक्कम पन्नास हजार रुपये इतकी होती. गुरुवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी ही घोषणा केली.

 

"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातून जातीव्यवस्थेचा समूळ विल्हेवाट लावण्यासाठी आंतरजातीय विवाह हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे सांगितले होते. मात्र त्या प्रमाणात आंतरजातीय विवाह होताना दिसत नाही. समाजातील अंधश्रद्धा, जातीय वाद, सरंजामी रुढी-परंपरा, जातपंचायतीच्या नावाची बंधने समाजातून नष्ट करण्यासाठी केवळ आंतरजातीय विवाह हाच पर्याय आहे. त्यामुळे आम्ही आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी अडीच लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे." असे बडोले म्हणाले. तसेच, आंतरजातीय विवाहातून होणाऱ्या हत्यांच्या घटना सुरु आहेत. या कुप्रथांच्या विरोधात संघर्ष तीव्र करण्याची गरजही बडोलेंनी व्यक्त केली.

 

"आंतरजातीय विवाह केल्यानंतरच्या घटनांचा मागोवा घेतला तर हत्येसारख्या घटनांपासून त्यांच्या अपत्यांना कायदेशीर संरक्षण, पोलिस मदत अशा बाबींचा समावेश या कायद्यात करणार आहोत. भावी काळात आंतरजातीय विवाहांना विशेष प्रोत्साहनाच्या योजना, शासकीय लाभ, अपत्यांना काही सवलती अशा बाबींचा समावेश करण्याचा मानस आहे. यासंबंधीच्या कायद्याचा मसूदाही तयार आहे." असेही त्यांनी यावेळेस सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0