हुकले द्विशतक पण मोडला ९० वर्षांपूर्वीचा विक्रम

04 Jan 2019 14:04:50



सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत भारताचा कणा फलंदाज चेतेश्वर पुजाराचे केवळ ७ धावांनी द्विशतक हुकले. तरीही त्याने एक नवा विक्रम स्वत:च्या नावावर केला. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत सर्वाधिक चेंडू खेळणारा पहिला विदेशी खेळाडू बनला आहे. त्याने ९० वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने या मालिकेत १२५८ चेंडू खेळले आहेत. पुजाराने १९३ धावांची खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला.

 

ऑस्ट्रेलियात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम इंग्लंडच्या हर्बट सटक्लिफच्या नावावर होता. त्यांनी १९२८ साली झालेल्या अॅशेश मालिकेत ४ सामन्यांच्या मालिकेत ७ डावात १२३७ चेंडू खेळून काढले. त्यात त्यांनी १ शतक आणि २ अर्धशतकांच्या साहाय्याने ३५५ धावा काढल्या. इंग्लंडने ही मालिका ४-१ ने जिंकत अॅशेजवर नाव कोरले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0