बदलापूरमध्ये केमिकल कंपनीला आग

04 Jan 2019 12:53:13



ठाणे : राज्यभरातील आगीच सत्र काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. विशेषत: मुंबई आणि आजुबाजूच्या शहरात गेले महिनाभर अग्नितांडव सुरू आहे. बदलापूरच्या एमआयडीसीमधील प्लेटिनम पॉलीमर नावाच्या केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

 

बदलापूर ,अंबरनाथ ,उल्हासनगर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ६ गाड्या दाखल झाले आहेत. गरज पडल्यास अजूनही गाड्या पाठवण्यात येतील अशी माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

 

कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलने भरलेली ड्रम आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने कंपनीमध्ये स्फोट होत आहे. त्यामुळे परिसरात जोरदार आवाज येत असून तर ४ ते ५ किलोमीटरवर धुराचे लोट उडाले आहेत. या स्फोटांमुळे आणि भीषण आगीमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अद्याप कुठलीही जीवितहानीचे वृत्त हाती मिळालेले नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0