बचत गटांनी उत्पादित केलेली उत्पादने ॲपवर!

31 Jan 2019 13:21:57



महालक्ष्मी ई-सरसॲपवरून ऑनलाईन खरेदी करता येणार


मुंबई : राज्य सरकारने बचत गटांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. यामाध्यमातून बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू ग्राहकांना ऑनलाईन मागवता येणार आहेत. यासाठी शासनाने ‘Mahalaxmi eSaras’ मोबाईल ॲप सुरु केले आहे. याद्वारे सध्या मुंबई व नवी मुंबई येथील ग्राहकांना मोबाईल ॲपद्वारे बचत गटांनी उत्पादित केलेल्या हव्या त्या वस्तू मागविता येणार आहेत.

 

गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप नुकतेच उपलब्ध करुन देण्यात आले आहे. वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर सुरु असलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनात राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या ॲपचे अनावरण करण्यात आले होते. या ॲपवर सध्या ५० वस्तू उपलब्ध करुन देण्यात आल्या असून भविष्यात या ॲपवर वस्तूंची संख्या आणखी वाढविण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

खाद्य उत्पादने ते कश्मिरी कुर्ते उपलब्ध

 

सध्या या ॲपवर खाद्य उत्पादने, हातमाग उत्पादने, वस्त्र उत्पादने, ज्वेलरी, हार्बल, कॉस्मॅटिक्स, युटिलीटी साहित्य उपलब्ध आहे. विशेष करुन पर्स, हँड बॅग, लाकडी कंदील, बांबूपासून बनविलेली बुद्ध मूर्ती, बांबूपासून बनविलेला पंखा, टोपल्या, बांबूपासून बनविलेला डस्टबीन, निम ऑईल, ईअर रिंग्ज, गोट मिल्क सोप, हेअर क्लच, पैठणी साडी, कोशा सिल्क साडी, कश्मिरी कुर्ते, मेंढीच्या लोकरीपासून बनविलेल्या टोप्या आदी साहित्य खरेदीसाठी उलब्ध आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0