नवी दिल्ली : मॅसेज डिलीट करता येण्याच्या व्हॉट्सअॅपवरील फीचरला यूजर्सनी खूप पसंती दर्शवली. व्हॉट्सअॅपवरील हा फीचर आता फेसबुक मॅसेंजरवरही उपलब्ध होणार आहे. फेसबुकच्या मॅसेंजरवरूनही आता मॅसेज डिलीट करता येणार आहेत. अशी माहिती मिळाली आहे.फेसबुक मॅसेंजरवरून एखाद्याला पाठवलेला मॅसेज डिलीट करता येत नाही.
याआधी व्हॉट्सअॅपवरही असेच चित्र होते. परंतु तासाभरात पाठवलेला मॅसेज डिलीट करण्याचा पर्याय व्हॉट्सअॅपने उपलब्ध करून दिला. त्यामुळे चुकून पाठवलेला मॅसेज तासाभरात व्हॉट्सअॅपवरून डिलीट करता येतो. फेसबुक मॅसेंजरवरूनही अशाप्रकारचे अनावश्यक मॅसेज डिलीट करता यावेत. यासाठी लवकरच फेसबुक हे फीचर आपल्या मॅसेंज्रवर आणणार आहे. त्यादिशेने फेसबुक तसे प्रयत्नदेखील करत आहेत.
‘डिलीट फॉर एव्हरीवन’ आणि ‘डिलीट फॉर यू’ असे व्हॉट्सअॅपवर उपलब्ध असणाऱ्या पर्यायाप्रमाणेच ‘रिमूव्ह फॉर एव्हरीवन’ आणि ‘रिमूव्ह फॉर यू’ असे दोन पर्याय फेसबुक मॅसेंजरवर युजर्सना वापरता येतील. सध्या फेसबुककडून या दोन फीचर्सची चाचणी करण्यात येत आहे. एका युजरने रेडिटवर शेअर करून याबाबत माहिती दिली. व्हॉट्सअॅपवर एका तासाच्या आत पाठवलेला मॅसेज डिलीट करता येतो. परंतु फेसबुक मॅसेंजरवर मॅसेज डिलीट करण्यासाठी कालावधी किती असेल, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. फेसबुकच्या मॅसेंजर अॅपवर लवकरच हे फीचर उपलब्ध होणार आहे. अँड्रॉइड मॅसेंजर अॅपमध्ये डार्क मोडवर या फीचरची चाचणी करण्यात येत आहे.