नव्या वर्षात दिसले निरुपम यांचे दोन चेहेरे

03 Jan 2019 16:55:03
 
 

मुंबई : कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांच्यावर मुंबई भाजपचे उपाध्यक्ष मोहित कंम्बोज यांनी ट्विटरद्वारे निशाणा साधला आहे. मोहित कंम्बोज यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत निरुपम यांचे दोन चेहरे, अशा ओळी या पोस्टवर लिहिल्या आहेत. संजय निरुपम यांनी थर्टीफर्स्टच्या रात्री हॉटेलमध्ये पार्टी केली त्यानंतर सकाळी दादरच्या सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेतले.

 
 
 

मोहित कम्बोज यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या मजकूरात संजय निरुपम के दो चेहेरे..., जनता को दिखाने के लिये नववर्ष कि शुरुवात मंदिरमे कि थी. जबकी सारी रात मयखानेमे गुजरी है. यह देखे व्हिडियो, अशा शब्दांत त्यांनी निरुपम यांना टोला लगावला आहे.

 
 
 

दरम्यान या ट्विटनंतर संजय निरुपम यांनी या पोस्ट ला दुजोरा देत मी या हॉटेलमध्ये होतो, असे म्हटले आहे. मी माझ्या परिवारासह तिथे गेलो, असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जर हा गुन्हा असेल तर मला अटक करा, असे ट्विटर निरुपम यांनी केले आहे. दरम्यान यानंतर मोहित कम्बोज यांनी आणखी एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

 
Powered By Sangraha 9.0