रेल्वेत खानपानासाठी डिजिटल पर्याय

28 Jan 2019 10:09:10

 

 
 
 
नवी दिल्ली : लांबच्या पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधील खानपान सेवेमध्ये पारदर्शकता यावी. यासाठी आयआरटीसीने डिजिटल पेमेंट सेवा सुरु केली आहे. यामुळे ट्रेनमधील प्रवाशांना क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पेमेंट करता येईल. प्रजासत्ताक दिनापासून आयआरटीसीने या सेवेची सुरुवात केली.
 

लांबच्या पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये अल्पोपहार, भोजन आणि सुट्या स्वरुपात खाद्यपदार्थ उपलब्ध असतात. प्रवास मोठ्या कालावधीचा असल्याने अनेक प्रवासी हे खाद्यपदार्थ विकत घेतात. परंतु अनेकदा खाद्यपदार्थांच्या बिलावरून रेल्वे प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी यांच्यामध्ये वाद होतो. रेल्वे प्रवासी अतिरिक्त पैसे घेतात. अशी तक्रार प्रवाशांकडून केली जाते.

 

या लांबच्या पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये मिळणाऱ्या सर्व खाद्यपदार्थांचे दरपत्रक प्रवाशांना देण्याची व्यवस्था आधीच आयआरटीसीने केली आहे. आता रेल्वेगाड्यांमध्ये खाद्यपदार्थ कार्ड स्वॅप करून घेता येतील. त्यासाठी प्रत्येक रेकमध्ये पीओएस (पॉइंट ऑफ सेल) मशीन्स पुरवावीत. अशी सूचना करण्यात आली आहे. रेल्वेगाड्यांच्या पॅन्ट्री कारसाठी सध्या २२०० पीओएस मशीन्स देण्यात आली आहेत. लवकरच या पीओएस मशीन्सच्या संख्येत वाढ करण्यात येईल. असे आयआरटीसीने म्हटले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
Powered By Sangraha 9.0