सायनाला इंडोनेशिया मास्टर्सचे विजेतेपद

27 Jan 2019 19:18:43



जकार्ता : भारताची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. अंतिम फेरीत सायनाचा सामना प्रतिस्पर्धी कॅरोलिना मरिनशी होणार होता. सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे तिने डॉक्टरांची मदत घेतली. परंतु, वैद्यकीय तपासणीनंतर कॅरोलिना ही सामन्यात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर तिने माघार घेत असल्याचे सांगितले.

 

पहिल्या सेटमध्ये मरिनने दमदार सुरुवात केली. ती सायनापेक्षा वरचढ ठरत होती. सुरुवातीला तिने सायनावर १०-४ अशी आघाडी घेतली होती. मात्र, नशिबाने सायनाला साथ दिली. सर्व्हिस करत असताना मरिनचा पाय मुरगळ्याने तिला गंभीर दुखापत झाली. मरिनची ही दुखापत गंभीर असून त्यामुळे ती आता यापुढे ७ महिने खेळू शकणार नाही.

 

२६ जानेवारीला ५८ मिनिटांमध्ये मारली अंतिममध्ये धडक

 

सायना नेहवालने २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी उपांत्य फेरीचा सामना जिंकून इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. उपांत्य फेरीमध्ये सायनाने चीनच्या बिंगजियाओचा १८-२१, २१-१२, २१-१८ असा पराभव करीत अंतिममध्ये धडक मारली होती. ५८ मिनिटांपर्यंत चाललेल्या या सामन्यात सायनाने विजय मिळवला होता. सायनाचा बिंगजियोआविरुद्ध कारकिर्दीमधील पहिला सामना होता. सायनाने गेल्यावर्षी झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक आणि आशियाई गेम्समध्ये कांस्य पदक जिंकले होते. तसेच डेन्मार्क, इंडोनेशिया मास्टर्स आणि सय्यद मोदी इंटरनॅशनल टूर्नामेंटच्या फायनलमध्ये धडक मारण्यात सायनला यश आले होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0