प्लास्टिकच्या राष्ट्रध्वज वापरू नका; प्रशासनाचे आवाहन

25 Jan 2019 12:56:52


 


मुंबई : दरवर्षी २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, १ मे, इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा मोठ्याप्रमाणात वापर करण्यात येतो. मात्र, कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी पडलेले असतात. याचमुळे आपल्या ७०व्या प्रजासत्ताक दिनी प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर करु नये, असे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आले आहे.

 

राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये याची दक्षता घ्यावी. तसेच कार्यक्रम झाल्यानंतर मैदानात, रस्त्यावर व इतर ठिकाणी इतस्ततः पडलेले, खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तहसील वा जिल्हास्तरीय समित्यांकडे सुपुर्द करावेत असे राज्य शासनातर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा १९७१ कलम २ नुसार कारवाई करण्यात येते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0