रवनीतसिंह गिल येस बॅंकेचे सीईओ

24 Jan 2019 17:25:41

 

 
२९ जानेवारी रोजीच्या बैठकीत अंतिम निर्णय 
 
 
मुंबई : खासगी क्षेत्रातील प्रमुख बॅंक असलेल्या येस बॅंकेने रवनीत सिंह गिल यांची मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालकपदावर नेमणूक केली आहे. या पदावरील राणा कपूर यांचा कार्यकाळ ३१ जानेवारी रोजी संपुष्ठात येणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने त्यांच्या मुतदवाढीला नकार दिला होता. राणा कपूर हे त्यांची नातेवाईक बिंदु कपूर यांच्या कंपनीत येस बॅंकेचे प्रमोटर म्हणून आहेत. २९ जानेवारी रोजी होणाऱ्या कंपनी बोर्डाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
 

येस बॅंकेने जाहीर केलेल्या एका पत्रकात म्हटल्यानुसार, १ मार्च, २०१९ पूर्वी रवनीतसिंह गिल हे पदभार स्वीकारणार आहेत. २९ जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान गुरुवारी ही घोषणा झाल्यावर येस बॅंकेच्या शेअरमध्ये मजबूती दिसून आली. या वृत्तामुळे बॅंकेचा शेअर १८ टक्क्यांनी वधारला होता. दिवसअखेर तो १४.३२ टक्क्यांनी वाढत २२५.५० रुपयांवर बंद झाला. आरबीआयने राणा कपूर यांना हटवल्यानंतर येस बॅंकेचा शेअर दोन तृतीयांशांनी घसरला होता. आज झालेल्या नव्या अध्यक्षांच्या घोषणेनंतर ५२ आठवड्यात ४० टक्क्यांनी निचांकावर आहे.

 

कोण आहेत रवनीत सिंह गिल ?

रवनीत गिल सहा वर्षे ड्युश बॅंक ऑफ इंडियाचे प्रमुख आहेत. बॅंकींग क्षेत्रात गेली ३० वर्षांहून अधिक अनुभव त्यांच्याकडे आहे.

 

रजत मोंगियाही होते स्पर्धेत

येस बॅंकेचे वरिष्ठ समुह अधिकारी रजत मोंगिया यांचेही नाव या स्पर्धेत होते. गेल्या आठवड्यात बॅंकेने संबंधित पदांसाठीची यादी आरबीआयकडे सोपवली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0