राहुल गांधी इटलीला जा; अमेठीमध्ये शेतकऱ्यांच्या घोषणा

24 Jan 2019 14:58:56



नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीत मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी राहुल गांधींनी चांगलीच कंबर कसली आहे. निवडणूकीच्या पाश्वभूमीवर त्यांच्या अमेठी मतदार संघात मॅरेथॉन बैठका दौरे सुरू केले आहेत. मात्र, त्यांच्याच मतदार संघाने त्यांना नाकारल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले.

 

अमेठी दौऱ्यादरम्यान त्यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले. राहुल गांधी तुम्ही इटलीला जा, अशी घोषणाबाजी शेतकऱ्यांनी केली. जमीन राजीव गांधी फाउंडेशनला या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. आमच्या जमीनी आम्हला परत द्या किंवा आम्हाला नोकऱ्या तरी द्या, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. आंदोलनकर्ते शेतकरी हे गौरीगंजचे रहिवासी असून त्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळाला नसल्याचा त्यांचा आरोप आहे.

 

आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याने प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, राहुल गांधींनी त्यांची जमिन हडपल्याचे म्हटले आहे. राहुल गांधीमुळे आम्ही खूप दु:खी आहोत. त्यांनी आमची जमीन हडप केली आहे. त्यांनी परत इटलीला निघून जावे.'' शेतकऱ्यांनी सम्राट सायकल कारखान्यासमोर आंदोलन केले. या कारखान्याची पायाभरणी राजीव गांधी यांनी केली होती. मात्र, येथील जमिनीबाबत १९८० पासून विवाद सुरू आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0