कर्नाटकमध्ये बुडाली बोट; १६ जणांना जलसमाधी

21 Jan 2019 19:49:08



बंगळुरू - समुद्रात बोट बुडाल्याने १६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या बोटीमध्ये २२ प्रवासी होते. कर्नाटकच्या कारवारजवळ सकाळी ही घटना घडली. आतापर्यंत या बोटमधील १६ प्रवाशांचे मृतदेह मच्छिमार आणि कोस्टगार्डच्या साहाय्याने बाहेर काढण्यात यश आले आहे. तसेच इतर बेपत्ता प्रवाशांसाठी शोधमोहिम सुरू आहे.

 

समुद्रात बुडालेल्या या बोटीतून २५ प्रवासी प्रवास करत होते. कारवार अरेबियन समुद्राजवळील कुर्मघडा येथे ही घटना घडली आहे. आतापर्यंत यातील १६ जणांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. अद्यापही १३ प्रवासी शोधण्यात यश आलेले नाही. सुरेश, आदर्श, श्रीनिवास आणि चेतन कुमार अशी शोधण्यात आलेल्या ४ प्रवाशांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0