जनावर तस्करांनी पोलिसाला चिरडले!

    दिनांक  21-Jan-2019


 
 
 
 
नागपूर : जनावरांची तस्करी करणाऱ्या एका वाहनाने पोलिसा शिपायाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील खांबाडा तपासणी नाका येथे ही घटना घडली. प्रकाश मेश्राम असे या पोलीस शिपायाचे नाव होते. त्यांचा मृत्यु झाला आहे. याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.
 

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दारू माफियांनी पोलीस उपनिरिक्षक छत्रपती चिडे यांची वाहनाखाली चिरखून हत्या केली होती. यानंतर दोन महिन्यांनी नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील खांबाडा तपासणी नाका येथे अशाच प्रकारची घटना घडली. नागपूर-चंद्रपूर महामार्गावरून जनावरांची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

 

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरु केली होती. खांबाडा तपासणी नाक्यावर जनावरांची तस्करी करणारे वाहन पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु तस्कारांनी वाहन न थांबवता पोलीस शिपाई प्रकाश मेश्राम यांच्या अंगावर वाहन चालवत नेले. पोलीस शिपाई प्रकाश मेश्राम यांचा जागीच मृत्यु झाला. याप्रकरणी कारवाई करून पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/