दोन महिलांनी घेतले शबरीमला मंदिरात दर्शन

02 Jan 2019 11:37:59


 
 
 
 
तिरूवनंतपुरम : केरळ येथील शबरीमला मंदिराची शेकडो वर्षांपासून असलेली परंपरा खंडित झाली आहे. दोन महिलांनी पोलीस बंदोबस्तामध्ये भगवान अयप्पाचे दर्शन घेतले. त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना असलेली प्रवेशबंदी उठवली होती.
 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर केरळमधील काही हिंदुत्ववादी संघटनांनी महिलांच्या मंदिर प्रवेशाला विरोध केला होता. या विरोधानंतर काही महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आंदोलकांनी केलेल्या अटकावामुळे त्यांना पोलीस बंदोबस्त असूनही दर्शन घेता आले नव्हते. अखेर बिंदू आणि कनकदुर्गा या दोन महिलांनी शबरीमला मंदिरात जाऊन भगवान अयप्पाचे दर्शन घेतले.

 

केरळमधील एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दोघांनी सांगितले की,पहाटे साडेतीनच्या सुमारास दोघींना मंदिरात प्रवेश घेण्यात यश मिळाले. या दोन्ही महिलांसोबत पोलीसदेखील होते. दर्शन घेतल्यानंतर या दोन्ही महिला कुठे गेल्या याची माहिती त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव गुप्त ठेवण्यात आली आहे. या दोन्ही महिलांचे वय ४० पेक्षा कमी असल्याचे सांगितले जात आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
Powered By Sangraha 9.0