आंबेनळी घाटाच्या दरीत कोसळला ट्रक ; २ ठार

02 Jan 2019 16:57:54



रायगड - आंबेनळी घाटात चालकाचे गाडीवरील नियत्रंण सुटल्याने ट्रक खोल दरीत कोसळला. या अपघातात ट्रक चालक व क्लिनरचा मृत्यू झाला आहे. दोघांचेही मृतदेह दरीतून ट्रेकरच्या मदतीने काढण्यात आले आहेत. आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ट्रक जॉन्सन कंपनीच्या टाईल्स व पाण्याचा बाटल्या घेऊन जात असताना, ही घटना घडली.

 

प्रशांत जाधव आणि शेख असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. दोघांचे मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील वाई येथील भोसले यांचा ट्रक, रोहा येथून चालक व क्लिनर घेऊन वाईकडे निघाले होते. या ट्रकमध्ये टाईल्स भरलेले होते. ट्रक आंबेनळी घाटात आल्यानंतर चालक प्रशांत जाधव यांचा ट्रकवरिल ताबा सुटला. त्यामुळे ट्रक खोल दरीत कोसळला. या ट्रकमध्ये चालकासह क्लिनर शेख हाही होता. या दोघांचाही या अपघातात मृत्यू झाला. स्थानिक मदतनीस, ट्रेकर आणि प्रशासनाच्या मदतीने दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0