निर्मला सीतारमन यांची सैन्य भरती संदर्भात मोठी घोषणा

19 Jan 2019 13:34:11

लष्कराच्या विविध विभागामध्ये २० % महिलांची भरती


 
 
दिल्ली : संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी घोषणा केली की, लष्करी सेवेमधे वर्गीकृत करण्यात येईल आणि लष्कराच्या एकूण संख्ये पैकी 20 टक्के महिलांचा समावेश असेल.
  सैन्या मधे महिलांचे  प्रतिनिधीत्व वाढवण्याच्या उद्देशाने हा  निर्णय घेतला गेला असल्याचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सांगितले .
 त्यांची भूमिका बलात्कार आणि छळवणूक प्रकरणाची तपासणी करणे, आवश्यक आहे  तेथे लष्कराला मदत करणे हे असेल ,

 सुरुवातीला महिला लष्करी पोलिसांच्या पदांवर भरती केली जाईल.सध्या, लष्कराच्या वैद्यकीय, कायदेशीर, शैक्षणिक, सिग्नल आणि अभियांत्रिकी पदांवर व अश्या  निवडक क्षेत्रांमध्ये महिलांना परवानगी आहे. 
संरक्षण राज्यमंत्री सुभाष भमरे यांनी सांगितले की, लष्करामध्ये महिलांची संख्या 3.80 टक्के आहे, वायुसेनेत 13.0 9 टक्के आणि नेव्ही सहा टक्के आहे.
Powered By Sangraha 9.0