या जगात आपल्या आगमनाची वर्दी "ट्याहाँ " करून आपणच जगाला करून देत असतो. इथपासून ते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला साथ देणारा, आपली खास ओळख बनणारा तो म्हणजे आपला आवाज. यालाच नंतर 'गोड गळा' 'कोकिळकंठ' 'मुलुख मैदान' 'गजघन्टा ' ते अगदी 'नरडं' अशी अनेक विशेषणं व्यक्तिपरत्वे लावली जातात. आवाज हे माणसाचं व्यक्तिमत्व घडविण्याचं देखील माध्यम आहे. वक्ता असो की गायक, आवाज सक्षम, प्रभावी असेल तरच आपलं मत लोकांसमोर तितक्याच प्रभावीपणे मांडता येतं. परंतु अनेकदा आपण या आवाजाची काळजी घेत नाही किंबहुना दुर्लक्षच करतो. त्यासाठी प्रथमतः: आपण, 'हा आवाज निर्माण कसा होतो ?' ते थोडक्यात पाहू या. ज्याला आपण ढोबळमानाने 'घसा' असं म्हणतो त्या गळ्याच्या भागात अन्ननलिकेच्या पुढे आणि श्वासनलिकेच्या खाली स्वरयंत्र असतं. फुफ्फुसातून हवा बाहेर पडताना या स्वरयंत्रातील पडद्यांचं कंपन होऊन स्वरनिर्मिती होते. हे स्वरयंत्र नाजूक स्नायूंनी बनलेलं असतं.
या स्वरयंत्रावर वेगवेगळ्या कारणांनी ताण येत असतो. शिक्षक, प्राध्यापक, मोठमोठ्या सभांना संबोधित करणारे वक्ते, रस्त्यावर माल विकणारे विक्रेते यांचं या ताणाकडे लक्ष जात नाही किंवा व्यावसायिक गरजांमुळे दुर्लक्ष करावं लागतं. वातावरणातलं प्रदूषण, वातावरणातील बदल हे देखील स्वरयंत्रावर घशावर परिणाम करतात. थंड, तेलकट आंबट अशा प्रकारचे पदार्थ जास्त खाल्ल्यानेही आवाज बसणे, घशात खवखव, घसा सुजणे असे अनेक विकार होतात . सर्दी, कफ, खोकला यांमुळेदेखील घशाला त्रास होतो. लहान वयातच गायला सुरुवात करणाऱ्यांना वयाच्या एका टप्प्यावर आवाज फुटण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. या सगळ्यांमध्ये घशाची योग्य प्रकारे काळजी घेणं आवश्यक असतं बरेचदा आपण या अशा त्रासांकडे दुर्लक्ष करतो किंवा तात्पुरते उपाय करून वेळ मारून नेतो.
यासाठी आयुर्वेदात सांगितलेल्या प्रभावी वनौषधींपासून तयार केलेलं गुणकारी उत्पादन म्हणजे ' पितांबरी कंठवटी'. फक्त गायकच नव्हेत तर शिक्षक, सूत्रसंचालक, सेल्समन अशा सर्वांसाठीच 'पितांबरी कंठवटी' अत्यंत उपयुक्त आहे. 'पितांबरी कंठवटी' मध्ये घशाची आणि स्वरयंत्राची पूर्णपणे काळजी घेणाऱ्या नऊ गुणकारी वनौषधींचा उत्तम संयोग आहे. यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास 'ज्येष्ठमध' जे घशाची सूज कमी करतं, घशातला ओलावा टिकवून ठेवतं. 'कंकोळ' हे स्वरयंत्राची ताकद वाढवतं. 'खदिर' घशातली खवखव दूर करतं. अशा अनेक गुणांनी युक्त, आवाजाची काळजी घेणारी, गोड गोळ्यांच्या स्वरूपातली 'पितांबरी कंठवटी' म्हणजे घशाला आराम आणि खोकल्याला पूर्णविराम.
तर मग तुम्ही गायक असा वा निवेदक, वक्ता असा व शिक्षक किंवा आमच्या दैनिकाचे सजग वाचक; आपल्या या ओळखीची अर्थात आपल्या आवाजाची नक्कीच काळजी घ्या आणि आपलं व्यक्तिमत्व घडवा. 'पितांबरी कंठवटी'मुळे ते आता अगदी सोपं झालं आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/