मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या ‘महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी’द्वारे येत्या २८ जानेवारीपासून १ फेब्रुवारीपर्यंत ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ मुंबईत आयोजित केला जात आहे. यासाठी जवळपास दीड हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाल्याची माहिती महाराष्ट्र व जनसंपर्क महासंचानालयच्या अधिकृत ट्विटरवरून देण्यात आली आहे. या सप्ताहामध्ये राज्यातील विविध स्टार्टअप्सना आपल्या अभिनव संकल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे.
राज्य सरकारच्या या उपक्रमात आपली संकल्पना सादर करण्यासाठी प्रत्येक स्टार्टअप अर्ज करू शकतो. त्यापैकी निवड झालेल्या शंभर अभिनव संकल्पना स्टार्टअप्सना उद्योग जगतातील तज्ज्ञ, गुंतवणूकदार, शासकीय अधिकारी यांच्यासमोर मांडता येतील. शिवाय यांच्यातील पहिल्या २४ स्टार्टअप्सना १५ लाख रुपयांची कामेही सरकारकडून देण्यात येणार आहेत. शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, कृषी, प्रदूषणविरहित ऊर्जा, जल व कचरा व्यवस्थापन, प्रशासन, सर्वसमावेशक आर्थिक विकास आदी क्षेत्रातील स्टार्टअप्सना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/