अमित शाह यांना स्वाईन फ्लू, एम्समध्ये भर्ती

16 Jan 2019 22:05:25

 

 
 
 
 
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह यांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्यामुळे शाह यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमित शाह यांच्या ट्विटर अकाऊंटवरूनच याबाबत माहिती देण्यात आली.
 
 
 
 

छातीत दुखत असल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आधी प्रसिद्ध झाले. यानंतर शाह यांच्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांना स्वाईन फ्लू झाल्याची माहिती देण्यात आली. त्यांना आता एम्समध्ये भर्ती करण्यात आले असून येथील डॉ. गुलेरिया यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ईश्वरकृपा आणि आपणा सर्वांचे प्रेम व शुभेच्छांच्या पाठींब्यावर मी लवकरच बरा होईन, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
Powered By Sangraha 9.0