‘गेम ऑफ थ्रोन्स सीझन ८’ चा टीझर प्रदर्शित

14 Jan 2019 15:55:57

 

 
 
 
  
मुंबई : ‘गेम ऑफ थ्रोन्स’ च्या सीझन ८ चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून‘गेम ऑफ थ्रोन्स’ चे चाहते या मालिकेच्या सीझन ८ ची वाट पाहत होते. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका आज जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ सीझन ८ च्या टीझरसह या मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली.
 

९० सेकंदाचा हा टीझर असून त्यात तीन महत्त्वाची पात्र दाखविण्यात आली. या टीझरवरून ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा शेवटचा सीझन कसा असेल याचा अंदाज बांधता येतो. ट्विटरवरून ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेच्या अधिकृत अकाऊंटवरून हा टीझर लाँच करण्यात आला. अवघ्या काही वेळातच या टीझरला लाखो व्ह्यूज मिळाले.

 
 
 

‘गेम ऑफ थ्रोन्स’चा हा ८ वा सीझन फक्त ६ भागांचा असणार आहे. हा प्रत्येक भाग एका सिनेमाएवढ्या मोठ्या कालावधीचा असणार आहे. या सीझनमध्ये आयर्न थ्रोनवर कोण बसणार? Azor Ahai कोण आहे? Clegane bowl कोण जिंकणार? Cersei ला कोण मारणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी प्रेक्षकांना १४ एप्रिलची वाट पाहावी लागणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
Powered By Sangraha 9.0