नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी जेएनयु प्रकरणी पतियाळा न्यायालयात आरोप पत्र सादर केले असून यात १० प्रमुख आरोपींची नावे आहेत. यात कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य आदी नावे सामाविष्ठ करण्यात आली आहेत. यात कन्हैया कुमार, अनिर्बान भट्टाचार्य, उमर खालिद, सात काश्मिरी विद्यार्थ्यांसह अन्य ३६ जणांवरही आरोप आहे.
संबंधित याचिकेनुसार, कन्हैया कुमारने देशविरोधी घोषणा दिल्या होत्या. घटनास्थळी उपस्थितांनी दिलेल्या जबाबानुसार ही याचिका दाखल केली आहे. पोलिसांना कन्हैया कुमारचा व्हिडिओ सापडला आहे. कन्हैय्या कुमारला संपूर्ण कार्यक्रमाची पहिल्यापासूनच माहिती होती. आरोपपत्रातील ७ काश्मिरी विद्यार्थ्यांची चौकशी यापूर्वीच करण्यात आली आहे.
कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य आणि अन्य सात आरोपींचे नाव हे ११व्या कॉलममध्ये आहे. यांच्याविरूद्द सबळ पुरावे सापडल्याचा दावा पोलीसांनी केला आहे. देशद्रोह, दंगल भडकवणे आणि अवैध प्रकारे एकत्र येणे आदी आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/