खुशखबर; MPSCची ५५५ जागांसाठी भरती

12 Jan 2019 14:23:51



मुंबई : महाराष्ट्रातील बेरोजगारांसाठी आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या "महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-२०१९"साठी भरती निघाली आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे. गट-ब पदाच्या ५५५ जागांसाठी ही भरती असून यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या पदांचा समावेश आहे.

 

सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) पदासाठी २४ जागा, राज्य कर निरीक्षक (गट-ब) पदासाठी ३५ जागा, पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) पदासाठी ४९६ जागा आहेत. यासाठी ०१ मे २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे पूर्ण असलेले पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. या जणांसाठी अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गाला ३७४ रुपये तर मागासवर्गीय उमेदवाराला २७४ आकारली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस २९ जानेवारी २०१९ असणार आहे. यासाठीची आधीच माहिती आयोगाच्या https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx वेबसाईटवर उपलब्ध आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0