'अलीबाबा'चे सर्वेसर्वा निवृत्त होणार

08 Sep 2018 17:38:26




 


न्यूयॉर्क: चीनची ई-कॉमर्स कंपनी 'अलीबाबा'चे सहसंस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष जॅक मा यांनी निवृत्तीची घोषणा केले आहे. येत्या सोमवारी ते निवृत्ती स्वीकारणार असल्याची माहिती त्यांनी इंग्रजी वर्तमानपत्रला दिली. पुढे निवृत्तीनंतर शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. ते पुढे सांगतात की, माझी सेवानिवृत्ती एका युगाचा अंत नाहीतर एका युगाची सुरुवात आहे. यापुढे मला आवडणाऱ्या शिक्षण क्षेत्रातच मी माझा वेळ आणि पैसे गुतंवणार आहे.

 

जॅक मा यांनी अगोदरही शिक्षक म्हणून काम केले आहे. जॅक मा निवृत्तीनंतरही अलीबाबा संचालक मंडळाचे सदस्य असतील. जॅक मा सोमवारी ५४ वर्षांचे होतील. याच दिवशी चीनमध्ये राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जातो.

 

काय आहे 'अलीबाबा'?

 

'अलीबाबा' ही चीनमधील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे. जॅक मा यांनी १७ लोकांसोबत मिळून १९९९ मध्ये चीनच्या झेजियांगच्या हांगझूमध्ये आपल्या अपार्टमेंटमध्येच 'अलिबाबा'ची स्थापना केली होती. आता अलिबाबा कंपनीची वर्षभराची कमाई जवळपास २५० अरब युआन (४० अरब डॉलर) आहे. Alibaba.com या नावाने प्रसिद्ध असलेली त्यांची कंपनी आता जगात १९० कंपन्यांशी जोडली गेली आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0