रेहमानकडून केरळवासीयांना एक कोटीची मदत

04 Sep 2018 16:53:13




 


 मुंबई: केरळमधील महापुराच्या थैमानानंतर राज्यात अन्नतुटवडा आणि रोगांचे वावटळ पसरले आहे. अशा अनेक समस्यांना सामोरे जाण्यासाठी देशभरातील अनेक सेलेब्रेटींकडून पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, चिरंजीवी अश्या अनेकांनी मदतीचा हाथ पुढे केला. आता यामध्ये ऑस्कर विजेता संगीतकार ए.आर.रहमान याचे देखील नाव जोडले गेले आहे. रहमानने केरळ पूरग्रस्त निधीसाठी एक करोडची रक्कम देऊ केली आहे.
 

रहमान आणि त्याच्या टीमने अमेरिकेमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामधून मिळालेला निधी रहमानने पूरग्रस्तांना देणार आहे. कार्यक्रम संपल्यानंतर त्याने ही घोषणा केली. रेहमानने ट्विटरवरून आपली भावना व्यक्त करताना असे सांगतले की, 'केरळमधील माझ्या बांधवांसाठी मी आणि माझे सहकारी अमेरिकेला पोहचलो. या छोट्याशा मदतीमुळं त्यांचं दु:ख काही प्रमाणात का होईना हलकं होईल.'

 
 
 

या महापुरामुळे केरळ राज्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या पुरामध्ये ३००हून अधिक लोकांचे बळी गेले असून २ लाखापेक्षा जास्त लोकांचे विस्थापन झाले आहे. एकूण मालमत्तेचे नुकसान २०,००० करोड एवढे झाल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. आतापर्यंत, मुख्यमंत्री मदत निधीमध्ये १,०३१ करोड जमा झाले असून ३२० करोड खर्च झाले आहेत. पारदर्शकता राखण्यासाठी, मुख्यमंत्री मदत निधीच्या संकेत स्थळावर जमाखर्चाची सर्व माहिती देण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0