पाकिस्तानकडून पुन्हा सीमेचे उल्लंघन

30 Sep 2018 16:20:52


 

श्रीनगर: पाकिस्तानच्या कुरापती अजूनही कमी होताना दिसत नाही. आतापर्यंत सीमेपलिकडून अतिरेक्यांची घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानने आता हवाई सीमांचेही उल्लंघन केले आहे. रविवारी दुपारी सुमारे १२.१५ वाजता जम्मू काश्मीर येथील पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानचे हेलिकॉप्टर भारतीय हद्दीत फिरताना दिसले. हे सुरक्षा रक्षकांना लक्षात येताच त्यांनी त्या दिशेने गोळीबार करत पळवून लावले.

 

जितक्या उंचीवर हे हेलिकॉप्टर होते त्यावरुन संशय व्यक्त करण्यात येत आहे की, ते या भागाची टेहळणी करायला आले होते. नियमांनुसार, रोटरवाले कोणतेही विमान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या एक किमी जवळ येऊ शकत नाही. तर विनारोटरवाले दुसरे कोणतेही विमान सीमेच्या १० किमीच्या जवळ येऊ शकत नाही. दरम्यान, या घटनेनंतर नियंत्रण रेषेवर अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानने भारतीय हद्दीत हेलिकॉप्टर का घुसवले याचा शोध घेतला जात आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0