नेपाळमधील कृष्णमंदिर तब्बल ३ वर्षांनी भक्तांसाठी खुले

03 Sep 2018 13:29:33



 
 
नेपाळ : नेपाळमधील कृष्णमंदिर ३ वर्षांनी भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. २०१५ साली नेपाळमध्ये झालेल्या भूकंपानंतर हे मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. भूकंपादरम्यान या मंदिराचे मोठे नुकसान झाले होते. हे नुकसान भरून काढत मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या कृष्णमंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे १७ व्या शतकात सिद्धी नरसिंह मल्ल यांनी बांधले होते. त्यामुळे या कृष्णमंदिराला आज अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्याचे बांधकाम हे भारतीय शिखर शैलीतील आहे.
 

 

 
 

ललितपुर येथे हे कृष्णमंदिर स्थित असून तेथे दरवर्षी जन्माष्टमीनिमित्त भक्तांची प्रचंड गर्दी असायची. परंतु गेली ३ वर्षे हे कृष्णमंदिर भूकंपानंतरच्या दुरुस्तीसाठी बंद होते. आता पुन्हा एकदा या कृष्णमंदिरात दर्शनासाठी भक्त गर्दी करू लागले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0