नवीन २८६ सरकती जिने उभी राहणार

29 Sep 2018 15:19:27



पश्चिम, मध्य हार्बर मार्गाच्या रेल्वेस्थानकांवर मिळाली मंजुरी


मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन नवनवीन उपाय योजना राबवत असतं. त्यातच गेल्या वर्षभरापासून झालेल्या रेल्वे परिसरातील मोठ्या दुर्घटनेमुळे यावर विशेष भर देण्यात येत आहे. यामध्ये पुढील वर्षअखेरपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर नवीन २८६ सरकत्या जिन्यांची उभारणी करण्यात येणार आहे. एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार दरम्यान तर मध्य रेल्वेच्या कर्जत, कसारा हार्बर रेल्वेच्या पनवेल स्थानकापर्यंत हे जिने बसवण्यात येणार आहेत.

 

नवीन २८६ सरकत्या जिन्यांमुळे जिन्यांवरील गर्दी कमी होणार असून ज्येष्ठ नागरिक, अपंग प्रवाशांना चढ उतार करणे सोप्पे होणार आहे. काही दिवसांपासून अनेक स्थानकांवर सरकते जिने लिफ्टची सोय करण्यात आली आहे. एका जिन्यांसाठी साधारण एक कोटी रुपये खर्च येत असून त्याच्या उभारणीसाठी एक महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे आता हे जिने कधी पर्यंत बसून होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0