मुंबईकरांसाठी खुशखबर! ‘कोस्टल’ मार्ग मोकळा

26 Sep 2018 15:35:21


 
 
 
 
मुंबई : ईस्टर्न एक्स्प्रेस वे मुंबई आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी होणारा कोस्टल रोडच्या कामास लवकरच सुरूवात होणार आहे. महापालिका हा कोस्टल रोड बांधत असून त्यासाठी तब्बल १२ हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. मरिन ड्राईव्ह येथी प्रिन्सेस स्ट्रीट आणि वरळी सी-लिंक येथे लवकरच कोस्टल रोडच्या या कामास शुभारंभ होणार आहे. येत्या ४ वर्षात हा रोड बांधण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोस्टल रोडमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे.
 

कोस्टल रोडच्या कामासाठी नरिमन पॉईंट ते मालाड-मार्वेपर्यंत समुद्र किनाऱ्यालगत भराव टाकला जाणार आहे. एकूण ३५ किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड बांधण्यात येणार आहे. या कोस्टल रोडचे वैशिष्ट्य म्हणजे हा रोड जमिनीवर तसेच जमिनिखालून, उड्डाणपूलावरून, टनेलमधूनही जाणाऱ्या स्वरुपात असणार आहे

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0