मनोहर पर्रिकर यांच्या कॅबिनेटमध्ये बदल

24 Sep 2018 12:05:40

 


 
 
 
गोवा : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या कॅबिनेटमधून दोन मंत्र्यांना आजारपणामुळे वगळण्यात आले आहे. फ्रान्सिस डिसुझा आणि पांडुरंग मदकईकर अशी या दोन मंत्र्यांची नावे असून त्यांच्या जागी निलेश कॅब्रल आणि मिलिंद नाईक या दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही मंत्री गेल्या बऱ्याच काळापासून आजाराने त्रस्त होते. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती गोव्यातील मुख्यमंत्री कार्यालयातून आज देण्यात आली.
 

फ्रान्सिस डिसुझा यांना अमेरिकेतील एका रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर पांडुरंग मदकईकर यांना जून महिन्यात ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यावर ते सध्या मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दोन मंत्र्यांच्या जागी निलेश कॅब्रल आणि मिलिंद नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज संध्याकाळी ते मंत्रीपदाची शपथ घेतील. गोव्यातील नागरिकांसाठी हा निर्णयात्मक बदल असणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0