आर. के. स्टुडिओचा अखेरचा 'गणपती बाप्पा मोरया'

23 Sep 2018 21:39:52


 

मुंबई: राज कपूर यांनी सुरु केलेल्या आर.के.स्टुडिओत गणेशोत्सव उत्सवाला आज पूर्णविराम लागला आहे. गेली ७० वर्ष इतर मंडळांप्रमाणेच आर.के.स्टुडिओच्या गणपतीची ही चर्चा असायची. कारण कपूर कुटुंबीयांनी स्टुडिओ विकणार असल्याचे सांगितले होते. असे असूनही दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणपतीची मिरवणूक वाजतगाजत निघाली. रणबीर कपूर आणि राजीव कपूर यांनी विसर्जन मिरवणुकीला हजेरी लावली होती. दरवर्षी गणेशोत्सवात कपूर कुटुंबियांसोबत, आर. के.च्या चित्रपटांचे तंत्रज्ञ, स्टुडिओतील कामगार असे सगळे एकत्र आले होते. आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देताना कलाकारांसोबत चित्रपट प्रेमीदेखील भावुक झाले होते.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0