मिरवणूकीला जाणाऱ्या पाच भाविकांचा मृत्यु

23 Sep 2018 11:58:40
 

 

 
बुल़डाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा भागात गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोलपथकातील पाच जणांवर काळाने घाला घातला आहे. बुलडाण्यात लोणारनजीक जीप आणि आरामबस दरम्यान शनिवारी रात्री झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले. सर्वजण वाशिमचे राहणारे आहेत.
 
वाशिमच्या भरजहागीर येथून एक ढोलपथक पिकअप बोलेरो जीपमधून शनिवारी रात्री सिंदखेडराजाकडे निघाले. विसर्जन मिरवणुकीत ढोलताशे वाजवण्यासाठी त्यांना बोलवण्यात आले होते. लोणार तालुक्यातील ब्राह्मण चिकना गावाजवळ नागपूर-मुंबई महामार्गावर हा अपघात झाला. त्यात जीपमधील पाच जण जागीच ठार झाले. अरुण संजय कांबळे (२२), राजू भगवान कांबळे (२५), ज्ञानेश्वर वामन डोंगरे (२०) अशी मृतांची नावे असून अद्याप दोघांची नावे समजू शकली नाहीत. पथकातील आठजण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर बीबीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
Powered By Sangraha 9.0