राज्यातील तब्बल ३७ वाहन निरिक्षक निलंबित

22 Sep 2018 13:02:03

 


 
 
मुंबई : राज्यातील अपाघातांची संख्या वाढतेय. त्यामुळे उच्च न्यायालयाने याची दखल घेतली. वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देताना काटेकोरपणे तपासणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने प्रादेशिक परिवहन विभागाला दिले होते. परंतु या आदेशाकडे दुर्लक्ष करत वाहनांना नियमबाह्य योग्यता प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी परिवहन विभागाकडून २८ मोटार वाहन निरिक्षक व ९ सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक अशा एकूण ३७ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. औरंगाबाद, यवतमाळ, कोल्हापूर, पुणे, पनवेल व ठाणे येथील कार्यालयातील हे अधिकारी होते.
 

योगिता अत्तरदे, हरीशकुमार पवार, किशोर पवार, संतोष गांगुर्डे (औरंगाबाद), ए.व्ही. गवारे, विजयसिंह भोसले, समीर सय्यद, प्रदीप बराटे, रंगनाथ बंडगर, राजेंद्र केसकर, संदीप म्हेत्रे, अनिस अहमद सरदार बागवान, विजय सावंत, संभाजीराव होलमुखे, नितीन पारखे, त्रिवेणी गलिंदे, सावन पाटील, ज्योतीलाल शेटे (पुणे), सुनील क्षीरसगार, मयूर भोसेकर (पिंपरी-चिंचवड), ललित देसले, सुनील म्हेत्रे, सुरेश आवाड, समीर शिरोडकर, रवींद्र राठोड (ठाणे), प्रदीप ननवरे, रमेश पाटील (पनवेल), रवींद्र सोलंके (सांगली), सुनील राजमाने, यू. जे. देसाई अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0