'आसरा' मोबाईल ॲपचा शुभारंभ

21 Sep 2018 17:57:43


मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटरवरून दिली माहिती 

 
 
 
 
 

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने तयार केलेल्या 'आसरा' (AASRA) या मोबाईल ॲपचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली. ११ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीतमध्ये या ॲपचे सादरीकरण करण्यात आले होते. या अॅपमुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अधिक पारदर्शी आणि कार्यक्षम होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

 
 

'आसरा' हे ॲप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असणार असून या ॲपद्वारे विविध सोयी सुविधा आणि योजनांची माहिती मिळणार आहे. यामुळे प्रत्येक सामान्य व्यक्तीला या ॲपचा लाभ होणार आहे. त्याचबरोबर सामान्य झोपडीधारक आपली झोपडी व झोपडपट्टीसंबंधित झोपडी क्रमांक, गाव, प्रभाग, तालुका, जिल्हा, स्लम क्लस्टर २०१६ आदी माहिती ॲपद्वारे घेऊ शकतील.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0