विकासदर ७.८ टक्क्यांवर : ‘फिच ’चा अंदाज

21 Sep 2018 18:39:00
 

नवी दिल्ली : फिच या जागतिक मानांकन संस्थेने २०१८-१९ या वर्षी भारताचा विकासदर ७.८ टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. फिच ने यापूर्वी ७.४ टक्के इतका अंदाज व्यक्त केला होता. जागतिक मानांकन संस्थांचा भारतीय अर्थव्यवस्थेबाबतचा दृष्टिकोन सकारात्मक होत आहे. जूनच्या तिमाहीत हा विकासदर हा ८.२ टक्के इतका होता. गेल्या १५ तिमाहीतील हा दर सर्वोत्तम आहे. एक वर्षांपूर्वी हा आकडा ५.६ टक्के होता. 

 
 
भारताची आर्थिक परीस्थिती मजबूत असून विकासदरात वाढ होणार असल्याचे फिच या मानांकन संस्थेने म्हटले आहे. फिच ने म्हटल्यानुसार, जीएसटी आणि नोटाबंदीसारख्या परीक्षांमधूनही भारताची अर्थव्यवस्था सावरली आहे. गेल्या तिमाहीतील वाढता विकासदर हे त्याचेच उदाहरण आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात विकासदर ०.२ अंशांनी वाढून ७.३ टक्के असेल असा अंदाज फिच ने वर्तवला आहे. अर्थव्यवस्थेबाबत सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या सकारात्मक निर्णयांचाही फायदा होणार असल्याचेही यात सांगण्यात आले आहे. सरकारच्या सकारात्मक निर्णयमुळे बांधकाम क्षेत्राला फायदा होईल. सरकारच्या पंतप्रधान आवास योजना, रस्ते व महामार्ग विकास आदींमुळे या उद्योगालाही चालना मिळेल, असा अंदाज आहे.

 

परकीय गंगाजळी वाढणारफिच ने भारताच्या विकासदराबाबत वर्तवलेल्या अंदाजामुळे परकी गुंतवणूकदारांचा भारताबाबत सकारात्मक प्रतिसाद दिसून येईल. भारतीय बाजारपेठेत परकी गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0