केबिन क्रूच्या चूकीमुळे विमानप्रवाशांच्या नाकातून रक्त

20 Sep 2018 12:01:37

 

 
मुंबई : जेट एअरवेज विमानातील एका केबिन क्रूच्या चूकीमुळे प्रवाशांच्या नाकतोंडातून रक्त आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विमानातील हवेचा दाब नियंत्रित करणारा स्विच बंदच राहिल्याने विमानात हवेचा दाब वाढला. त्यामुळे प्रवाशांच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागले. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराहट पसरली. जयपूरला जाणारं हे विमान मुंबईला पुन्हा उतरवण्यात आलं. गुरुवारी पहाटे या मुंबई-जयपूर या विमानाने उड्डाण केलं. काही क्षणात हा सर्व प्रकार घडू लागल्याने प्रवाशांचा गोंधळ उडताच विमान पुन्हा उतरवण्यात आलं. विमानातील हवेचा दाब नियंत्रित करण्यासाठी विमान उड्डाण करण्यापूर्वी एक स्वीच सुरू करावा लागतो. केबिन क्रू हा स्वीच सुरू करण्यास विसरला. विमानात एकूण ११६ प्रवासी होते. त्यापैकी ३० जणांना हा त्रास जाणवू लागला. त्यानंतर एकच गोंधळ सुरू झाला. त्यानंतर विमान उतरवून प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान जेट एअरवेज प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.
 
 

  माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
Powered By Sangraha 9.0