जेमी डाइमन यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे कौतूक

20 Sep 2018 17:27:59
 
 

नवी दिल्ली : जगभरातील मोठ्या देशांपैकी एक असलेला भारत देश हा आर्थिक स्थितीत मजबूत होत आहे. मोदी सरकारने घेतलेल्या जीएसटीची अंमलबजावणी, सरकारी बॅंकांचे विलिनीकरण आदी अर्थव्यवस्थेशी संबधित कठोर पावले उचलल्यामुळे भारताचा जीडीपी दर तेजीत आहे, असे गौरवोद्गार जे.पी. माॅर्गन कंपनीचे मुख्य सचिव जेमी डाइमन यांनी काढले आहेत. भारताची आर्थिक स्थिती इतर देशांच्या तुलनेत गतिमान असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

  
भारताच्या सुक्ष्म अर्थव्यवस्थेत इतकी आव्हाने नाहीत. सध्या भारतापुढे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेल्या कच्च्या तेलांच्या किमतींचे आव्हान आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. मोदींचे कौतूक करताना ते म्हणाले, मोदी यांची प्रतिमा भारताच्या राजकारणात मजबूत आहे. त्यामुळे देशाला अशा आणखी कठोर आणि सर्वसामावेशक निर्णयांची गरज आहे. त्यामुळे देशाची स्थिती आणखी मजबूत करायची असेल तर मोदी सरकारला अजून कठोर निर्णय घ्यावे लागतील.’’  भारताचा जीडीपी हा ८.२ टक्के आहे आणि तो जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. परकीय गुंतवणूकदारांनी साशंक होऊन भारतातील गुंतवणूक काढून घेतली आहे. मात्र, त्यांनी तसे न करता आणखी काही काळ वाट पाहायला हवी, असेही ते म्हणाले.
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0