आॅफिस मध्ये काम करत मरायचे नाही : जॅक मा

20 Sep 2018 13:29:51
 
 
 

टायनजीन : चीनी ई-काॅमर्स क्षेत्रातील कंपनी 'अलीबाबा'चे सहसंस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष यांनी आफिसमध्ये काम करण्याबाबतचे आपले मत व्यक्त केले. जॅक मा हे पुन्हा अलीबाबामध्ये रुजू होणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, मला आॅफिसमध्ये काम करता करता मरायचे नाही, मला इथल्या समुद्र किनाऱ्यावर मस्त आयुष्य घालवत अखेरचा श्वास घ्यायचा आहे.

 
गुरुवारी चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'वर्ल्ड इकोनोमिक फोरम समिट'मध्ये ते बोलत होते. जॅक मा यांनी अमेरीका आणि चीन यांतील व्यापार युद्धाच्या परीणामांबाबतही चिंता व्यक्त केली आहे. चीन आणि अमेरीकेच्या व्यापार युद्धाचे पडसाद नाताळपर्यंत राहाणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, व्यापार युद्धाचे परीणाम हे २० दिवस २० महिने उमटत नाहीत तर ते पुढील २० वर्षे उमटतील असे भाकीतही त्यांनी व्यक्त केले आहे. १९८० मध्ये अमेरिकेने जपानवर व्यापार निर्बंध लादेले होते. आता चीनबाबतही तशीच भूमिका घेतली जात असल्याची टीका त्यांनी केली आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
Powered By Sangraha 9.0