धक्कादायक; उड्डाण घेताच विमानाचे टायर फुटले!

20 Sep 2018 14:36:42


 

मुंबई : इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाची मोठी दुर्घटना टाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईहून उड्डाण घेतल्यानंतर या विमानाचे टायर फुटल्याचा प्रकार समोर आला. मुंबईवरुन अहमदाबादकडे हे विमान निघाले असताना हा प्रकार घडला. या विमानात एकूण १८५ प्रवासी होते. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितली.

 

वैमानिकाच्या प्रसंगावधाने या सर्व प्रवाशांचा जीव वाचला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, इंडिगो एअरलाईन्सचे ६ ई ३६१, ए-३२० हे विमान काल संध्याकाळी मुंबईहून अहमदाबादसाठी निघाले होते. मात्र या विमानाच्या उड्डाणानंतर काही वेळातच विमानाचे टायर फुटल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्यानंतर अहमदाबाद विमानतळावर या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. दरम्यान, वैमानिकाच्या या प्रसंगवधानाने १८५ प्रवाशांचे जीव वाचल्याने त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0