नागपूरमध्ये अपघातात पाच जण ठार

20 Sep 2018 18:17:43
 

 


नागपूर : जिल्ह्यातील कळमेश्वर-सावनेर मार्गावर वरोडा शिवारात भरधाव ट्रकने एका रिक्षाला धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षातील पाच जण जागीच ठार झाले. तर काही गंभीर जखमी आहेत. मृत प्रवाशांमध्ये तीन लहान मुले, एक महिला आणि पुरुषाचा सामावेश आहे. नागपुरात ताजबाग परिसरातील हे सर्वजण वरोडा शिवार दर्गा येथे जात होते. कळमेश्वर-सावनेर मार्गावर वरोडा शिवारात कळमेश्वरकडे जाणाऱ्या या भरधाव ट्रकने रिक्षाला धडक दिली. यात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना नागपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. गुरुवारी दुपारी ४ वाजता हा अपघात घडला. पाचही मृतदेह कळमेश्वरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहेत. या पाच जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी सध्या तणावाचे वातावरण आहे.

 
 
  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0