संरक्षणमंत्र्यांच्या हत्येचे चॅटिंग, दोघांना अटक

18 Sep 2018 12:49:42

 


 
 
देहरादून : देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची हत्या करण्याविषयी व्हॉट्सअॅप ग्रुपवर चॅटिंग करणाऱ्या दोघांना उत्तराखंड पोलिसांनी अटक केली आहे. या दोन तरुणांनी “मी सीतारामन यांच्यावर गोळी झाडणार, उद्या सीतारामन यांचा शेवटचा दिवस असेल” अशा शब्दांत चॅटिंग केले होते.
 

काल निर्मला सीतारामन या उत्तराखंड दौऱ्यावर होत्या. त्यामुळे त्यादिवशी उत्तराखंडमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुपवर हे चॅटिंग करण्यात आल्याने त्यांच्या हत्येचा हा कट होता का ? असा तपास सध्या पोलिस करत आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुपवर चॅटिंग करताना हे दोन्ही तरुण दारुच्या नशेत होते. परंतु त्यांनी अशी चॅटिंग का केली असेल, त्या दोन तरुणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? त्यांनी शस्त्रखरेदी केली आहेत का? या सगळ्या गोष्टींचा पोलिस कसून तपास करत आहेत. अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0